
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५० वा दिवस जे दुसऱ्यांना दोष देत असतात, अशांची संख्या दिवसेंदिवस सारखी वाढते आहे. ते बहुधा दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात. स्वतःच्या चुकांनी त्यांनी ती दुर्दशा स्वतःवर ओढवून घेतलेली असते. मग ते विनाकारण इतरांना दोष देत बसतात, परंतु त्याने त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा कसलाही फायदा होत नाही. उलट, दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या ह्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे मात्र बनतात. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कुणालाही दोष लावू नका. स्वतःच्या पायांवर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या. स्वामी विवेकानंद…

●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो● भारतीय सौर २८ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ बुधवार दि. १९ मार्च २०२५
★ रंगपंचमी ★ १८८४ आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा स्मृतीदिन
★ १९८२ स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी, समाजवादी, पर्यावरणवादी नेते, भारतीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य जीवटराम भगवानदास कृपलानी यांचा स्मृतीदिन
★ १९९८ केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा स्मृतीदिन.
★ रंगात रंग मिसळले की, आणखी नव्या छटा निर्माण होतात. माणसांनी माणसात मिसळले की, छान नाती तयार होतात. चला तर मग, रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी रंगोत्सव साजरा करूया.रंगपंचमीच्या आपणास व परिवारास शुभेच्छा.🔴🟠🔵🟡🟢🟣🟤🔴🟠🔵🟡
