
सिन्नर (प्रतिनिधी), दि. 30 ऑगस्ट 2025:सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलात एस.एन.डी.टी.सलग्न महिला महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले.हा उद्घाटन सोहळा राजाभाऊ प्रकाश वाजे (खासदार, नाशिक लोकसभा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देखील त्यांनी भूषविले.जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनीताई कोकाटे यादेखील या कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटक नामदार माणिकराव शिवाजीराव कोकाटे (क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने उपस्थित होत्या

.मा.खासदार राजाभाऊ वाजे यांनी आणि संस्थेचे जेष्ठ सभासद पांडुरंग हरी मिठे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महिला महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीची फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले..संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे साहेब यांनी संस्थेच्या स्थापने मागील उद्देश व ध्येय याबाबत सविस्तर माहिती देत ‘एक हात मदतीचा’

या संकल्पने अंतर्गत समाजातील बांधवांनी, हितचिंतकांनी, मान्यवरांनी तसेच मित्र परिवारांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करत त्या सर्वांचे यथोचित शब्दात आभार मानले व पुढेही हा मदतीचा ओघ संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.संस्थेचे सभासद आणि शाळेचे माजी विद्यार्थी असलेले विजय झगडे यांनी संस्थेच्या इतिहासाचा लेखाजोखा सर्व उपस्थितांसमोर प्रतिपादित केला. तसेच शाळेचे माजी क्रीडा शिक्षक नामदेव महात्मे सर यांनी इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा आणि प्राध्यापकांच्या महिला महाविद्यालय उभारणी बाबतच्या प्रतिक्रियांचा आवर्जून उल्लेख करत राजकीय मान्यवरांकडून क्रीडा विषयक असलेल्या अपेक्षा ठामपणे उपस्थितांसमोर मांडल्या.जिल्हा परिषद सदस्या मा.श्रीम.सिमंतिनीताई कोकाटे यांनी निवडणुकीनंतरही या संस्थेतील पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर एकत्र येऊन संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत झटत राहतात याबाबत अभिमानास्पद गौरव उद्गार काढले. तसेच माणिकराव कोकाटे साहेब यांनी मागे देखील संस्थेच्या प्रगतीसाठी मदत केलेली आहे आणि पुढे देखील त्यांचे सहकार्य राहील अशी ग्वाही देत क्रीडाविषयक कोणकोणती कामे आपल्या सिन्नर शहरात होणार आहे याची माहिती उपस्थितांना दिली.

सिन्नर शहरात सावित्रीबाई फुले यांच्या आशीर्वादाच्या रूपाने प्रथम महिला महाविद्यालय सुरू करणारी आणि बहुजन समाजासाठी सिन्नर मध्ये सर्वात जास्त काम करणारी संस्था म्हणून सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था असा संस्थेचा यथोचित शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार मा..राजाभाऊ वाजे यांनी गौरव केला.कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख अतिथी सत्यजित सुधीर तांबे (आमदार, विधान परिषद) यांनी देखील कार्यक्रमास आणि संस्थेच्या प्रगतिशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भैरवनाथ मित्र मंडळ टांगा ग्रुप लोणारवाडी चे सर्व पदाधिकारी यांनी संकुलास विद्यार्थ्यांसाठी १०० बेंच दिल्याबद्दल सर्वांचा यथोचित सन्मान मा.खासदार राजाभाऊ वाजे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष म्हणून नामदेव प्रताप लोंढे (अध्यक्ष, सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर) नामदेव विष्णू लोणारे (सेक्रेटरी,सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था,सिन्नर) उपस्थित होते. त्यांच्या समवेत संस्थेचे इतर पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात प्रमुख मान्यवर जुगल भागिनाथ गवळी (उपाध्यक्ष), रामनाथ दत्तात्रय बलक (सहसेक्रेटरी), मधुकर किसन खर्जे (खजिनदार), दत्तात्रय पांडुरंग गोळेसर (अध्यक्ष, CSR समिती) तसेच संचालक दत्तात्रय पोपटराव लोणारे, संदीप भाऊशेठ गवळी (संचालक)मा.सौ. मंगल श्याम झगडे सुधाकर लक्ष्मण गोळेसर, दत्ता उद्धव झगडे, दिगंबर रामभाऊ पगर, दत्तात्रय दादा लोंढे, संजय विष्णुपंत माळी, सरला नवनाथ वरंदळ हे उपस्थित होते. समन्वयक सदस्य म्हणून बाबासाहेब बाजीराव भगत, संजय सखाराम लोंढे, मदन विठ्ठल बांडे, प्रदीप विजय गोळेसर, व मनोज निवृत्ती महात्मे हे उपस्थित होते.तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष विष्णुपंत लोंढे, संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ, नारायण शेठ वाजे, प्रभाकर गोळेसर, महामित्र दत्ताजी वायचळे, अशोक महात्मे, सुनील गवळी, राजेंद्र आंबेकर, विजय वरंदळ, अनिल सरवार, रावसाहेब आढाव, सरपंच दत्तू मिठे, पांडुरंग मिठे, भागवत बलक, डॉ.जी.एल.पवार, एस बी देशमुख, दिनकर गोळेसर, रामनाथ लोंढे, महेंद्र वायचळे, सौ.प्रीती वायचळे, सविताताई कोठुरकर, कुरणेताई , मधुकर गोळेसर , बेनके सर, विष्णू वाघ, भाऊशेठ गवळी भारत झगडे, रघुनाथ गवळी, राजाभाऊ लोंढे, राजेंद्र गोळेसर, संस्थेवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजबांधव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व संयोजन राहुल चंद्रकांत वरंदळ (शिक्षणाधिकारी, स.वि.प्र.शि संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.तसेच विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी, जसे की मधुकर निंबा देशमुख (प्राचार्य), सौ. संगीता राजगुरू (मुख्याध्यापिका), गोकुळ महाले (प्राचार्य), एकनाथ माळी (उपप्राचार्य), तुषार बलक (उपप्राचार्य), सौ. सविता काठे ( प्रभारी पर्यवेक्षक), सौ.अलका खैरनार हे होते.या सर्वांच्या समन्वयातून आणि संकुलाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. गौरी मोरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सह सेक्रेटरी रामनाथ बलक यांनी मांडले.सदर इमारतीमुळे महिला शिक्षणाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही संस्था एक शिक्षणमंदिर ठरेल हे नक्की.
