
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव येथील विश्रामगृहा समोर असलेले अतिक्रमण काढुनी टाकावे. अशी मागणी करत अक्काबाई सोनवणे ह्या पोलिस स्थानकासमोर उपोषणास बसल्या आहेत. त्यांनी यापुर्वीही अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्यात येईल असे आश्वासन दिले होते.परंतु कारवाई न झाल्याने आक्काबाई सोनवणे उपोषणास बसल्या आहे.

