
लोहोणेर-(प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाला माजी विद्यार्थी एस.एस. सी बॅच १९८१-८२ यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची स्पीकर, एमलिफायर,माईक असलेली साउंड सिस्टिम भेट म्हणून देण्यात आली.नुकताच या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न झाला.त्यात हे विद्यार्थी त्रेचाळीस वर्षांनी एकत्र येत आपण ज्या विद्यालयात शिकलो,लहानाचे मोठे झालो,ज्या शाळेन चांगले संस्कार दिले अशा या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ही भेट शाळेला दिली. सदर हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर माजी विद्यार्थी सतिश सोमवंशी, निंबा धामणे,महेंद्र महाजन,मदन साखरे, कौतिक बागुल,शिवाजी बच्छाव, रघुनाथ बागुल आदींसह पर्यवेक्षक आर.एच.देसले व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता सागर होत्या. यावेळी प्रमुख अतिथी व माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महेंद्र महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेत असताना केलेल्या गमतीजमती,शाळेने दिलेली शिकवण,संस्कार यांना उजाळा देत शाळेचे महत्व सांगणारी कविता अहिराणी भाषेत सादर करत सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येण्याचे आणि चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले.त्यानंतर मविप्र संचालक विजय पगार यांनी आपले मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थी हे शाळेचे वैभव आहे शाळेच्या प्रगतीत व विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे अस मत व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटवस्तूबद्दल व शाळेच्या प्रती कृतज्ञता दाखवल्याबद्दल आभार मानले. शेवटी ही साऊंड सिस्टीम मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाला सुपूर्द करण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदानी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले तर राकेश थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *फोटो ओळ-:लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या सन १९८१-८२ “बॅचच्या विद्यार्थ्यांकडून भेट म्हणून देण्यात आलेली साऊंड सिस्टीम स्वीकारताना मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार समवेत माजी विद्यार्थी, मुख्याध्यापिका संगीता सागर आणि पर्यवेक्षक आर.एच.देसले.(छाया-:सुनिल एखंडे)*
