
मनमाड ( प्रतिनिधी )- मनमाड येथील मध्य रेल्वेचे कर्मचारी व कीर्तिनगर येथील रहिवाशी राजेंद्र लक्ष्मण वाघ यांचे नुकतेच वयाच्या ५९व्या प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. कै. राजेंद्र लक्ष्मण वाघ हे मूळचे धोडंबे येथील भूमिपुत्र असून ते मनमाड येथेच स्थायिक झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते आजरोजी “शून्यातून विश्व निर्माण” करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन स्वतःचे वेगळे अस्तित्व मनमाड शहरात निर्माण केले. कै. राजेंद्र लक्ष्मण वाघ हे मुंबई येथील वरिष्ठ बँक अधिकारी श्री. संजय लक्ष्मण वाघ, भारतीय खाद्य महामंडळ कर्मचारी श्री. कैलास लक्ष्मण वाघ आणि वंजारवाडी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती वैशाली वाघ मॅडम यांचे थोरले बंधू होय. कै. राजेंद्र लक्ष्मण वाघ यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनीता राजेंद्र वाघ, श्री. विक्रांत राजेंद्र वाघ व श्री. अजय राजेंद्र वाघ ही दोन मुले, कु. पल्लवी राजेंद्र वाघ ही मुलगी आणि सुनबाई सौ. काजोल विक्रांत वाघ असा परिवार आहे.
