
नाशिक ( प्रतिनिधी) निफाड तालुक्यातील विंचूर येथील भूमीपुत्र डॉ. महेंद्र गायकवाड यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेने त्यांना हा गौरव प्रदान केला आहे, त्यांच्या या यशामुळे विंचूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण विंचूर चा गौरव
मातीच्या ओढीने आणि कष्टाच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ गायकवाड परिवाराचे नसून संपूर्ण विंचूर गावाचे आहे डॉ. महिंद्राच्या या कामगिरीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
– शैलेश गायकवाड, भाऊ
