
नांदगाव – (मुक्ताराम बागुल):- नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशु बॉक्सिंग प्रकारात नांदगाव तालुक्यातील श्री संत सेवालाल महाराज संस्थेच्या व्ही एन नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा संतोष वाघ यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष एस जी राठोड, सचिव, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री संत सेवालाल महाराज संस्था संचलित व्ही एन नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसंत नगर येथील विद्यार्थी प्रश्न संतोष वाघ यांची युशु बॉक्सिंग स्पर्धेत विभाग स्थावर निवड झाली. नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कृष्णा वाघ हा विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक विजेता ठरला. त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

तसेच दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या कबड्डी संघ उपविजेता ठरला याबद्दल यशस्वी खेळाडूंचे श्री संत सेवालाल महाराज संचलित कनिष्ठ महाविद्यालय वसंत नगर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस जी राठोड, मार्गदर्शक श्री जी जी राठोड, संस्थेचे सचिव एस एस राठोड , प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
