
नांदगाव: (.प्रतिनिधी ) दिनांक- 30 ऑगस्ट 2025नांदगाव येथील सौ .क .मा .कासलीवाल माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल शहराजवळील ‘पंचमुखी महादेव ‘(पाटखाना) या निसर्गाच्या सानिध्यातील परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.येथील मंदिरातील महादेवाचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस मनसोक्त आनंद लुटला . सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंदांनी वनभोजनाचा आनंद देखील घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या परिसरात श्रमदान देखील केले. यानंतर गाणी , अभंग, गोष्टी,अभिनय, नृत्य, असे विविध मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी याप्रसंगी बोलताना निसर्ग आपणास भरभरून देत असतो,निसर्गाकडे देण्याची वृत्ती असते.निसर्गाची ही वृत्ती आपण आत्मसात करावी; व समाज हितासाठी निसर्गाचे संगोपन व संवर्धन करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ तसेच विद्यालयातील शिक्षक संजय त्रिभुवन, संजय शिवदे ,रवींद्र चव्हाण, शरद पवार, राहूल आहेर ,संदीप आहेर,मनोज साळुंखे, विजय गायकवाड, केतन दळवे,अनिकेत राऊत, मनोज व्हरगीर,रिझवान मन्सुरी , मयुर चव्हाणहर्षदा भालेराव , रुपाली मालकर ,योगीता गायकवाड ,पल्लवी काकळीज उपस्थित होते अतिशय आनंदाने , उत्साहाने व सर्वांच्या सहकार्याने निसर्गाच्या सानिध्यातील ही शैक्षणिक सहल पार पडली.
