
निगडोळ :-रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात शुक्रवार दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी हॉकीचे जादूगार स्व.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कबड्डी,खो-खो व इतर स्पर्धा घेण्यात आल्या.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद व खेळांचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व या विषयांवर आपल्या मनोगतातून प्रकाशझोत टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापडणीस एन.जे.यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए.व भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.
