
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१३ वा दिवस यथार्थ प्रेमाने कसलीच कष्टकर प्रतिक्रिया उद्भवत नसते. प्रेमाची प्रतिक्रिया आनंद, केवळ आनंद. असे नसेल तर ते प्रेमच नव्हे; आपण भलत्याच कशाला तरी चुकीने प्रेम म्हणत आहो असे खुशाल समजावे. जेणेकरून कष्ट, मत्सर अथवा स्वार्थीपणाची प्रतिक्रिया उद्भवणार नाही अशा रीतीने जर तुम्ही स्वतःच्या पतीवर, आपल्या पत्नीवर, मुलाबाळांवर, साऱ्या जगावर, नव्हे, अवघ्या विश्वब्रह्मांडावर प्रेम करण्यात यश संपादले असेल तरच खरेखरे अनासक्त होण्याची पात्रता तुमच्या ठायी आली आहे असे म्हणता येईल, एरवी नाही. *
स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ८ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ ★ महालक्ष्मी व्रतारंभ
★ १७७३ पुणे येथील शनिवार वाड्यात सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची हत्या केली.
★ १८५० प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित, समाजसुधारक, राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, सरचिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्मदिन.
