
नाशिक ( प्रतिनिधी ) यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिकची विद्यार्थिनी कु.पायल नामदेव निंबारे (११वी) हिने भगूर येथे झालेल्या १७ वर्षाआतील शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती (फ्री स्टाईल-४६ किलो) मध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.कु..पायल निंबारे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी वैशंपायन उपाध्यक्ष श्री.प्रभाकर कुलकर्णी , स्कूल कमिटी चेअरमन श्री.रमेश महाशब्दे,अधिक्षिका सौ.मिना वाळुंजे यांनी अभिनंदन केले आहे. २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने यश मिळवत शाळेला गौरव प्राप्त करून दिला आहे.याबद्दल तीचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी श्री.हेमंत बरकले यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे, क्रीडा मार्गदर्शक तथा उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी, मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,ग.कौ.सदस्य कैलास बागुल,सौ.भारती चंद्रात्रे ज्युनिअर कॉलेजचे श्री.पुरूषोत्तम खैरनार, श्री.चंदर बोरसे, श्री.जालिंदर वायकांडे.…
