
. नाशिक (प्रतिनिधी)..नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा “गुणवंत क्रीडा शिक्षक” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,यामध्ये यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिकचे क्रीडा शिक्षक राजेंद्र सोमवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी शिक्षक आमदार मा.श्री.किशोरजी दराडे,जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.सुनंदा पाटील, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.संजय चव्हाण,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री.विष्णू निकम श्री.अशोक दुधारे, श्री.नरेंद्र छाजेड,श्री. संजय होळकर, श्री. साहेबराव पाटील, श्री.आनंद खरे,श्री.राजू शिंदे क्रीडा अधिकारी श्री.अविनाश टिळे, श्री. भाऊसाहेब जाधव व जिल्हास्तरीय नाशिक जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते.

