
नांदगाव (प्रतिनिधी). “नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ च्या व्ही जे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड श्री गोरखनाथ बलकवडे (छत्रपती पुरस्कार प्राप्त कुस्तीगीर )अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ.जोगेश्वर नांदुरकर तसेच .व्यासपीठावर श्री योगेश शिरसाठ सौ निलम शिरसाठ राज्यस्तरीय कुस्तीगीर , शाळेची माजी कबडडी पट्टू कु.नारायणी जोशी कु समीक्षा पवार ..,क्रीडा शिक्षक श्रीमती देवरे सुनिता श्री. खंडू चौधरी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शाळेची राज्यस्तर खेळाडू कु हुमेरा पठाण कु प्रांजल घोलप कु रितु सोनस कु तनुष्का पांडे कु साईश्री बच्छाव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्याप डॉ नांदूरकर यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनप्रवास या बदल माहिती दिली

प्रमुख पाहुणे मा ॲड गोरखनाथ बलकवडे यांनी मन , मेंदू मनगट , यांचा समन्वय साधून देशाची भावी पिढि हि खेळातून घडत असते त्यासाठी भारतीय खेळाचे महत्व सांगितले त्यातुन आपले शरीर कसे सुदढ होते “सुदढ शरीर हिच खरीआपली संपती “आहे याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेची राज्यस्तर कबड्डी पटू कु हुमेरा पठाण हिच्या पालकांनी क्रीडा शिक्षिका श्रीमती सुनिता देवरे व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे आभार टि एम बोर्डे सदस्य शिक्षक सौ रूपाली झोडगेकर यांनी मानले

कार्यक्रम साठी श्री चंद्रकांत दाभाडे श्री विजय चव्हाण श्री ज्ञानेश्वर जाधव व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले !
