
कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतांना मुख्याध्यापक संजय डेर्ले सर उपस्थित सर्व शिक्षक,विद्यार्थी आदी
पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी) | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय डेर्ले सर हे होते.

व्यासपीठावर जेष्ठ शिक्षिका श्रीम सरला डंबाळे, श्रीम वंदना कदम मॅडम उपस्थित होत्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच क्रीडा साहित्याचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांना खेळाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

विद्यार्थी मनोगत प्रणव मोरे, याने क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले.शिक्षक मनोगतातुन श्री जगदीश कुशारे सर यांनी क्रिडा दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थी जीवनात क्रीडाक्षेत्र किती महत्त्वाचे असते.विद्यार्थ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आपला शारीरिक,मानसिक विकास साधला पाहिजे हे सांगितले.अध्यक्षीय मनोगतातुन श्री संजय डेर्ले सर यांनी व्यक्तिच्या जीवनातील खेळाचे महत्त्व सांघिक भावना, चिकटी, संघटन हे घटक खेळातून हृद्धिंगत होतात याविषयी माहिती सांगितली .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी

सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.सुंदर फलक लेखन कलाशिक्षक श्री अनिल शिरसाठ यांनी केले.तर सुत्रसंचालन व आभार कुमारी पायल गोसावी हिने केले.
