

अंदरसूल (प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार). येवला तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार व अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे गाव तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी पेठ असलेले अंदरसूल गावात पुरातन एकमेव विघ्नेश्वर गणपती मंदिर आहे या गणपतीची ख्याती महाराष्ट्रात सर्व दूर पोहचली असून अनेक विविध ठिकाणच्या भाविकांनी श्रद्धेने साकडे घेतल्यास त्याची फलश्रुती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे गावाच्या अत्यंत मध्यवर्ती भागात मंदिर असून या मंदिरासाठी धर्मदायक कार्यालयाने नोंदणी केलेली असून या मंदिराचा कारभार गावातील सर्व जाती च्या भक्तांची सेवाभावी वृत्तीने योगदान देणारी कार्यकारिणी असून

सर्व विश्वस्त व्यापारी सुशिक्षित सुसंस्कृत संयमी सोशिक असून स्वखर्चाने आपसात वर्गणी काढून कार्यक्रम सुरू करण्यात अग्रेसर आहेत महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला बालभोजन कार्यक्रम अनेक वर्षांपासून अव्याहत चालू असून या वेळी गावातील दानशूर श्रद्धावान नागरिक आर्थिक योगदान देत असतात या विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे

गरजू रुग्णांना त्यांना आवश्यक साधने वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात गणेश आगमन निमित्ताने सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य शोभा यात्रा गावातून काढण्यात येऊन पालखीचे पूजन गावातील सर्व जेष्ठ तरुण स्त्री पुरुष यांच्या हस्ते करण्यात आले

भाविक महिलांनी विठुनामाच्या गजरात पाऊली रिंगण फेरी केली भक्तिरसाने तल्लीन होऊन गणेशाची स्थापना केली वैजापूर येथील महाराष्ट्रात जवळपास सत्तर वर्षापासून प्रसिद्ध असलेला चाऊस ब्रास बँड च्या सुमधुर विविध भजने गाणे त्याच बरोबर मराठी हिंदी देशभक्तीपर जुने गाणे या बँड चे आकर्षण गावात पालखी सोहळ्यात भाविक भक्त तल्लीन झाले होते अंदरसूल गावाची परंपरा जतन करून मंगलमय वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे दर वर्षी गणपती स्तोत्र विविध धार्मिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात या पालखीचे गावातून गल्ली गल्ली मध्ये पूजन करण्यात आले भक्तांच्या शांततापूर्ण सोहळ्याची या विघ्नेश्वर गणपती मंदिर ची परंपरा जतन करण्यात आली आहे
