
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१२ वा दिवस* स्वतःच्या मुलांना काही दिल्यास तुम्ही काय त्यांना त्याचा काही मोबदला मागत असता ? त्यांच्याकडून काही प्रतिदान मिळण्याची आकांक्षा ठेवीत असता ? नाही. तर, त्यांच्याकरता काम करावें एवढ्यावरच तुमचें कर्तव्य संपतें. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, घरासाठी, समाजासाठी वा देशासाठी जें कार्य करण्याची तुमची इच्छा असेल तें कार्य करीत चला, परंतु पोटच्या पोराविषयी तुमच्या मनात जो भाव तोच त्यांच्यासंबंधी धारण करा. मोबदल्यांत त्यांच्याकडून काडीचीहि अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केवळ दाते आहात. तुम्ही जें देता त्याच्या परतफेडीची तिळमात्र अभिलाषा तुम्हांला येता कामा नये.
स्वामी विवेकानंद…

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ७ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ ★ १८८० लोकनायक माधव श्रीहरी अणे यांचा जन्मदिन
.★ १८९१ सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचा स्मृतीदिन
★ १९०५ भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन “राष्ट्रीय क्रीडा दिन”
★ १९६९ लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ‘शाहीर अमर शेख’ यांचा स्मृतीदिन
★ भारतीय क्रीडा दिन.*
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
