
नांदगाव ( प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मांडवड येथील स्व शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड विद्यालयात श्री गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्रींची प्राणप्रतिष्ठा संस्थेचे नांदगाव तालुका संचालक मा .अमितभाऊ बोरसे पाटील यांचे शुभहस्ते व शालेय समिती अध्यक्ष श्री.प्रशांतभाऊ आहेर यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव शालेय समितीचे अध्यक्ष श्री.विजयराव काकळीज सर,श्री.दिलीप आहेर,श्री.शिवाजी तात्या आहेर,संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री.बाळासाहेब गडाख,आण्णासाहेब गडाख,डॉ.निकम , श्री.योगेश भाऊ आहेर.शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. थेटे एस.जी,ज्येष्ठ शिक्षक श्री.कवडे सर श्री.परदेशी एच टी. श्री सातपुते सर,श्री वाळके सर ,श्री. चोळके सर,श्री.आहेर संदीप सर,श्री आहेर एन ए मामा ,कुमारी शितल जाधव,तेजस्विनी कदम,सूरज पवार,प्रणय थेटे,गौरी उगले, इ.१० वीचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात वाजत गाजत गणपती बाप्पांना विद्यालयात आणले गेले.

आकर्षक सजावट करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
