
चांदवड (प्रतिनिधी ) चांदवड येथील महाविद्यालयात महाअंनिस नाशिक जिल्ह्याच्यावतीने वैज्ञानिक (चमत्कारांचे) प्रयोग शिकवण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम झाला.प्रथम जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे व जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव यांनी चळवळीचे गीत म्हटले. नंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन अंनिसची पंचसूत्री थोडक्यात विशद केली. प्राचार्य डॉ. पालकर यांनी अंनिसच्या कार्याची गरज का हे सांगितले. जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव यांनी अंनिसचे सोपे व निवडक प्रयोग शिकवले व त्यांची विश्लेषणात्मक माहिती दिली, विद्यार्थ्यांकडून प्रयोग करून घेतले. यात सर्व विद्यार्थी मित्र – मैत्रिणींनी सहभाग घेतला. संपर्क शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. समर्थ केदारे याने आभार मानले.

