
नाशिक.(प्रतिनिधी ) सृजनसंवाद प्रकाशन प्रकाशित कविमित्र मनीष तपासे यांच्या ‘अस्वस्थ मनाच्या किनार्यावर…’ कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी संजय चौधरी यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ संपादक, लेखक व साहित्य अकादमी सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या अध्यक्षतेत शनिवारी पार पडले. याप्रसंगी ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. डॉ. गंगाधर अहिरे यांनी संग्रहाविषयी मौलिक मांडणी केली तर कवयित्री, समीक्षक प्रा. सुजाता राऊत यांनी तौलानिकदृष्ट्या या संग्रहाविषयी भाष्य केले. मी या संग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आणि मनीषच्या कवितेबद्दल भाष्य केले. नेटके व रसिकांची दाद घेणारे सूत्रसंचालन आरजे मानसी आमडेकरने केले. काव्यरसिकांच्या भरगच्च उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला त्याची ही क्षणचित्रे…हा कवितासंग्रह घरपोच मागवण्यासाठी ९८२०२७२६४६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करा मित्रमैत्रणींनो! ॲमेझॉनवरून पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.amazon.in/dp/9391895573
