
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव- मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील हिसवळ बुद्रुक शिवारातील शास्त्रीनगर फाट्यावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तालुक्यातील जळगाव बुद्रुक व पानेवाडी येथील दोघांचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नांदगाव – मनमाड रस्त्यावरील हिसवळ बुद्रुक शिवारात शास्त्रीनगर फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एम एच ४१ बीजी ८२२४ आणि एम एच ४१ बी.डी. ६३१६ या वाहनांची समारोसमोर धडक झाली. अपघात भीषण होता. दोन्ही वाहनांचा या अपघातात चुराडा झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकली गेली या अपघातात दिगंबर तुकाराम अहिरे व फकीरा भागा गांगुर्डे वय 35 हे दोघेही जागीच ठार झाले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर अपघातात जखमी आकाश पवार आणि मधुकर सानप हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मदतीने मदत व बचाव कार्य करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही वाहने वेगात धावत होती . त्यामुळे अपघात हा भीषण झाला दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते दरम्यान या घटनेने जळगाव बुद्रुक व पानेवाडी या गावावर शोककळा पसरली आहे.
