
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक अरुण पगार आणि कैलास लहांगे तसेच शिक्षक-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पर्यावरण संरक्षणासाठी शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे महत्त्व सांगितले.
