
लेखन:- विद्या कसबे, नांदगाव
प्रिय अंजुम ताई याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पूर्ण तालुक्याला स्वतःच्या घरासारखे जपणाऱ्या अंजुमताई चे नांदगाव व्यतिरिक्त ही ईतर ठिकाणी सामाजिक काम सुरू आहेत तसेच नांदगाव तालुक्यामध्ये धार्मिक स्थळांना सरळ हाताने मदत करण्यासाठी अंजुमताई कांदे नेहमी प्रयत्नशील असतात प्रत्येक धर्माच्या नागरिकांनी त्यांच्याकडे धार्मिक कार्यासाठी मदत मागितली तर त्या नाही कधीच म्हणत नाही तर सरळ हाताने मदत करतात व त्यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील अनेक मंदिरांचे कळस व बांधकाम पूर्ण झाले आहेत तालुक्यातील वारकरी संप्रदाय असेल जैन बौद्ध मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील अंजुम ताई आणि अण्णासाहेब यांच्या माध्यमातून त्यांचा योग्य तो सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच नांदगाव शहरातील सर्व धर्मीय धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण अंजुमताई यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले आहे त्यामुळे नांदगाव शहरातील धार्मिक स्थळांना एक वेगळेच सुंदर रूप प्राप्त झालेले आहे

मुस्लिम समाजासाठी शादी खाना असेल,शिवसृष्टी असेल तालुक्यातील बौद्ध विहार असतील नांदगाव शहरातील वेगवेगळे मंदिर असतील या संदर्भामध्ये अंजुमताईंचे काम दिसून येते त्यामुळे त्यांच्यामधील इतर धर्माबद्दल असलेली आपुलकी प्रेम व सर्वधर्मसमभाव ही वृत्ती आपल्याला दिसून येते. अंजुमताई एक असे व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तीमत्वाला दिवसेंदिवस चकाकी येत आहे आता ते प्रत्येकाच्या घराघरात नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला आहे. चूल आणि मूल या पलीकडे महिलांचे आयुष्य नाही याची जाणीव असलेल्या अंजुमताई यांनी प्रत्येक महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी काम केले आहे प्रत्येक समाजाच्या महिलांचे मेळावे घेतानी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी आवर्जून घेतलेले आहे त्यामागे त्यांची एकच भूमिका स्पष्ट होती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी महिला एकत्र येतील आणि आयुष्यातील काही क्षण आनंदाने एकमेकींसोबत घालवतील

ज्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या नव्या आशेने आणि नव्या उमेदीने स्वतःच्या आयुष्यामध्ये नव्याने काहीतरी सुरुवात करतील मग ते महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा छोट्या छोट्या व्यवसायातून असेल. महिलांच्या बाबतीमध्ये जर एखाद्या महिलेचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या मुलांचा प्रश्न असेल तरीही अंजुमताई च्या माध्यमातून तात्काळ ॲम्बुलन्स ची व वैद्यकीय उपचाराची मदत केली जाते त्यामुळे जेव्हाही तालुक्यातील कोणी अडीअडचणी मध्ये सापडतात तर त्यांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम अंजुमताई कांदे आणि सुहास कांदे हेच उभे राहतात खऱ्या अर्थाने लोकांच्या सुखदुःखासाठी दिवस-रात्र काम करणारी ही जोडी एक आदर्श जोडी आहे अशा अंजुमताई कांदे यांना आमदार सुहास अण्णा कांदे यांची साथ लाभली व त्या तालुक्यामध्ये एक सक्षम आमदार पत्नी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे व अंजुमताई कांदे मुळेच सुहास अण्णा कांदे यांना देखील तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं खूप सोपं झालं व लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत अण्णा हे जिव्हाळ्याचा विषय बनले त्यामुळे हे दोघेही तालुक्यासाठी एक वरदान ठरलेले आहेत हे म्हणणे वावगे ठरू नये. अशा अंजुम ताई कांदे यांनी नांदगाव विधानसभेच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पडल्यामुळे सुहास अण्णा कांदे च्या विजयासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली हे सर्वानी पाहिले. अशा माझ्या लाडक्या अंजुमताई च्या हातून यापुढेही समाजकार्य व धार्मिक कार्य घडो हीच प्रार्थना.

🎂🍫📚🖊️🌹 🌹🌹 विद्या कसबे 🌹🌹
