
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव:महाराष्ट्र राज्यात समतेसाठी न्यायासाठी लढणारी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी राजाभाऊ गुढेकर यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख नागेश गायकवाड यांच्या आदेशाने आणि जिल्हा अध्यक्ष भारत वाघमारे,(बी.इ.एस.डब्लू ए) दिलीप बेंद्रे यांनी नासिक येथील हॉटेल थीम प्लाझा हरियाली रेस्टॉरंट या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. समतेसाठी न्याय हक्कासाठी हे ध्येय उराशी बाळगुन आपण विषमतेच्या विरोधात जोरदारपणे विविध माध्यमातुन संघर्ष करत राहणार, या समतेच्या लढाईत सहभागी होऊन सामाजिक तत्वांशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहुन काम करण्याची अपेक्षा या वेळी राजाभाऊ गुढेकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी मार्गदर्शक रवींद्र भदाणे,महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना पारचा,शहराध्यक्ष शीतल अरणे,विलास कांबळे ,ज्ञानेश्वर घाटूळ,दादा बुखारी,कैलास बकुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भाजपचे नांदगाव तालुका उपाध्यक्ष ताराबाई शर्मा,गणेश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी गुढेकर यांचे अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार केला.
