
लासलगाव, दि. २३ ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रा.से.यो., रा.से.यो. +२ स्तर, एन.सी.सी. आणि माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नूतन विद्या प्रसारक संस्थेचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदरावजी होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे होते. याप्रसंगी मंचावर माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.हसमुखभाई पटेल, श्री.चंद्रशेखर होळकर, श्री.सचिनशेठ मालपाणी, ॲड.संदीप होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ रोशन बागुल, माजी विद्यार्थीनी कुमारी साक्षी मालपाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, एन.सी.सी. प्रमुख प्रा.बापू शेळके, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर, श्री.गणेश जाधव तसेच रक्तपेटीचे डॉक्टर आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, आजी व माजी विद्यार्थी तसेच स्पोर्ट, एन.सी.सी., एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तदात्यांकडून ३६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर आणि प्रास्ताविक श्री.उज्वल शेलार यांनी केले तर आभार डॉ.संजय शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
