
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००७ वा दिवस
समाजाचे व्यवसायात्मक वर्गातून विभाजन होणे अगदी स्वाभाविक आहे. मग यामुळे नष्ट काय होईल - विशेषाधिकार. समाज जीवनात मी एक प्रकारचे काम करू शकतो तर तुम्ही दुसऱ्या प्रकारचे काम करू शकता. तुम्ही राज्य चालू शकता आणि मी पादात्राने दुरुस्त करू शकतो. पण यामुळे माझ्याहून तुम्ही श्रेष्ठ कसे ठरणार. कारण तुम्ही माझी पादत्राणे दुरुस्त करू शकाल काय? तुम्ही वेदपठण उत्कृष्ट करू शकता म्हणून तुम्ही सर्वश्रेष्ठ कसे? त्यामुळे तुम्ही मला आपल्या पायाखाली का तुडवावे का?
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५
★ १८८० शेतीकाम घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून कविता करणाऱ्या कवयित्री, निरक्षर असूनही जिवंत काव्यरचनेची प्रतिभा असलेल्या खान्देश रत्न बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन.
★ १८८८ मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन.
★ १९०८ थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
