
नांदगाव ( प्रतिनिधी ) छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड येथे आज नांदगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाकडून आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. राजेंद्र गमन देवरे (अध्यक्ष); विकास उत्तम कराड (सचिव);जयवंत सुभाष पवार (सचिव); योगेश पांडुरंग अहिरराव (खजिनदार); अफजल अजमी (सह खजिनदार); सचिन वाल्मीक देवरे (अंतर्गत हिशोब तपासणीस); सौ. वर्षा पाटील (सह प्रसिद्धी प्रमुख) ; जीवन साळुंखे (जिल्हा प्रतिनिधी) यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर; संचालक प्रसाद पंचवाघ; संचालक अरविंद जोशी; उपमुख्याध्यापक व संचालक संदीप देशपांडे; मुख्याध्यापिका सौ. संगीता पोतदार; पर्यवेक्षिका विशाखा चांदवडकर; विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव व उपाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते.
