
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४८ वा दिवस या मातृभुमीचे आपण पुत्र आहोत, या संस्कृतीचे आपण वारस आहोत, या राष्ट्राचे आपण एक जबाबदार घटक आहोत. म्हणूनच या देशाशी, भूमीशी, समाजाशी आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे. यांचे ऋणी असले पाहिजे. व्यक्तीशः आणि संघटितरीत्या आपल्या सर्वांना हे ऋण फेडावयाचे आहे. असे जर आपण केले नाही तर आपण माणूस म्हणून घेण्यास लायक नाही. आपली गणना पशुमध्येच करावी लागेल. आपला देश, आपली संस्कृती, आपला समाज आज संकटात आहे. आपण काही वेळीच केले नाही तर, देशाची पातळी घसरेल, संस्कृती दुर्बल होईल, समाजामध्ये भेद निर्माण होतील. असे झाले तर आपली सांस्कृतिक मूल्ये नष्ट होतील. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २६ फाल्गुन शके १९४६
*★ फाल्गुन वद्य /कृष्ण ३★ शालिवाहन शके १९४६★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ सोमवार दि. १७ मार्च २०२५ ★ संकष्ट चतुर्थी ‘साखर चतुर्थी
‘★ १८८२ आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृतीदिन★ १९१० समाजसेविका अनुताई वाघ यांचा स्मृतीदिन.

