
लेखक – शंकर नामदेव गच्चे नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

वेरूळचे भोसले घराणे पूर्वीपासून सुप्रसिद्ध होते. मालोजीराजे भोसले हे या घराण्यातील एक पराक्रमी सरदार होते.रयतेविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम व जिव्हाळा होता. मालोजीराजे यांच्याकडे वेरूळची पाटीलकी होती. याच मालोजीराजे व दिपाबाई उर्फ उमाबाई यांना १८ मार्च १५९४ रोजी वेरूळ येथे पुत्रप्राप्ती झाली या पुत्राचे नाव शहाजी असे ठेवण्यात आले. शहाजीराजे हे पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील मालोजीराजे हे इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. वडिलांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाली. शहाजीराजे दुसऱ्याची चाकरी करीत होते पण त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या मुलांनी मात्र दुसऱ्याची चाकरी करता कामा नये म्हणून त्यांनी मोठा मुलगा संभाजी याच्यासाठी बेंगलोरला गादी स्थापन केली. सावत्रमुलगा व्यंकोजीसाठी तंजावरला गादी निर्माण केली तर छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांना पुण्याला पाठवून त्या ठिकाणी स्वतंत्र राज्य निर्माण करा असा आदेश दिला. निजामाच्या पुढाकाराने शहाजी व जिजाऊंचा विवाह मोठ्या थाटामाटात देवगीरी येथे इ.स. १६१०- १६११च्या सुमारास लखुजीराजाने करुन दिला.उत्साही वातावरणात प्रचलित रुढी परंपरेनुसार हा विवाह समारंभ संपन्न झाला. विवाहा नंतर जिजाऊंना एकूण आठ अपत्ये झाली त्यातील थोरला मुलगा संभाजी व धाकटा शिवाजी हे दोघेच जगले.संभाजी राजांचा जन्म इ.स.१६२३ मध्ये झाला.त्यानंतर ७ वर्षाच्या अंतराने शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊ व शिवराय बंगळूरमध्ये शहाजीराजांबरोबर वास्तव्य करीत असताना शहाजीराजांनी आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. जिजाऊ देखील त्यांच्याकडून या कालखंडात चांगली तयारी करून घेत होत्या. शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांच्या शिक्षणाची पूर्ण तयारी झाल्यानंतर जिजाऊ सोबत त्यांना पुण्यास पाठवले. शिवरायांना जिजाऊ सोबत पुण्यास पाठवत असताना त्यांच्या हातात त्यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज दिला हा ध्वज हिंदुत्वाचा नाही, भाजपचा नाही शिवसेनेचा नाही, तर हा ध्वज वारकरी संप्रदायाचा आहे. शिखर शिंगणापूरच्या महादेवाचा आहे. शिखर शिंगणापूर हे भोसल्यांचे कुलदैवत होते. त्याच बरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजमुद्रा दिलेली आहे.शिवाजी महाराजांबरोबर त्यांनी अष्ठप्रधान मंडळ पाठवले आहे.अष्ठप्रधान मंडळ ही राज्यभिषेकाच्या वेळची संकल्पना नाही तर शिवाजी महाजांबरोबर अष्ठप्रधान मंडळ वयाच्या बाराव्या वर्षापासून आहे. त्याचबरोबर ६००विश्वासू माणसे त्यांनी बंगळूरहून शिवाजी महाराजांबरोबर पाठवलेली आहेत. निजामशाहीची मुघल व आदिलशाही या दोन सत्तांच्या विरोधात अहमदनगर येथील भातवडी याठिकाणी इ.स.१६२४ मध्ये झालेल्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी मोठा पराक्रम केला या लढाईचे नेतृत्व जरी मलिक अंबरने केले असले तरी युद्धामध्ये पराक्रम हा भोसले बंधूंनी केला. शहाजीराजे आपल्या बाजूने राहिले तर मोगलांविरुद्ध लढताना आपणास त्याचा उपयोग होईल ही बाब लक्षात घेऊन आदिलशहाने शहाजीराजांना मोठ्या आदराने आदिलशाहीत सामील करून घेताना त्यांना फर्जंद हा बहुमान देऊन गौरव केला. याचा अर्थ असा की शहाजी हा स्वतंत्र सेनानी युवराजांच्या तोलाचा म्हणून त्यांना वजीर अधिकाऱ्यांनीही सन्मान द्यावा.

एकीकडे शिवाजी व संभाजींचे स्वराज्य स्थापनेचे उद्योग चालू होते,तर दुसरीकडे कर्नाटकातील शहांजी राजांच्या मोहीमाही यशस्वी होत होत्या.दोन वर्षापासून सतत एक एक मोहीम फत्ते करीत शिवाजी राजे यशोशिखरावर पोहचत होते.बाप लेकांच्या यशस्वी कामगिरीने विजापूर दरबारातील काही सरदार अस्वस्थ होते.त्यांनी शहाजीराजांच्या विरोधात चुगलीखोरीची मोहीम उघडली.शहाजी कर्नाटकातील हिंदू राजांना मदत करतो व त्यांचा पूर्ण नाश होऊ देत नाही हे व यासारखे आरोप लाऊन जिंजीच्या वेढ्याच्या वेळी मुस्तफाखानने शहाजी राजांना मध्ये राञी अटक केली.शहाजी राजांचा सर्व ऐवज जप्त करुन त्यांना बेड्या ठोकून अफजलखानाने त्यांची अपप्रतिष्ठा करीत विजापूरच्या बादशाहाच्या हवाली केले.या अटकेला आणखी एक प्रभावी कारण होते “मला तुमच्या आश्रयाला घ्या”.या आशयाचे एक पञ शहाजीराजांनी गोवळ कोंड्याच्या कुतुबशाहस लिहिले होते.त्यामुळे शहाजींच्या निष्ठेविषयी आदिलशाहाला संशय आला होता.शहाजींच्या दोन्ही पुञांच्या कारवायांनाही आवर घालण्याचा आदिलशाहाचा हेतू होता.त्यासाठी त्यांनी बंगलोरला संभाजीराजांना जिंकण्यासाठी फरीदखान व शिवाजी राजांना जिंकण्यासाठी फत्तेखान यांना पाठवले पण या दोघांचाही दारुण पराभव झाला.त्यामुळे नाईलाजाने आदिलशाहने काही अटीवर शहाजी राजांना सोडण्याचे ठरवले.बंगळूर व कंदर्पी हे दोन कील्ले संभाजीने व कोंढाणा हा कील्ला शिवाजीने विजापूरकरांना परत द्यावा म्हणजे शहाजी राजांची सुटका करु असे ठरले. संभाजी राजांने आपल्या अचाट पराक्रमाने मिळवलेले बंगळूर व कंदर्पी हे दोन्ही कील्ले आदिलशाहाच्या स्वाधीन केले.पण शिवाजी राजे माञ कोंढाणा किल्ला देण्यास तयार नव्हते.त्यांनी शहाजहांन यांना पञ पाठवले की माझे वडील शहाजी राजे यांना आदिलशाहाने बेकायदेशीर रीत्या अटक केली आहे.जेव्हा तुम्हाला दक्षिणेत गरज भासेल तेव्हा शहाजीचा हा पुञ शिवाजी तुमच्या साठी सदैव तयार आहे.हे पञ घेऊन त्यांनी सोनोपंत डबीर यांना पाठवले.शहाजहांने आदिलशाहाला सोनोपंत डबीर कडे लगेच पञ पाठवले.शहाजी राजे भोसले हे आमचे मिञ आहेत.त्यांना सन्मानाने सोडून द्या आणि त्यांची बढती करून घ्या नाहीतर तुमची गाठ शहाजहांशी आहे.तुमची आदिलशाही क्षणात नष्ट करुन टाकू.हे पञ मिळताच आदिलशाहाने शहाजी राजांना सन्मानाने सोडून दिलेले आहे.शहाजीराजे अतिशय विद्वान, सुसंस्कृत धाडसी, शूर धोरणी,पराक्रमी दूरदृष्टीचे व कल्पक होते. ते न्यायी होते. तसेच प्रेमळ होते राजनीती व समाजशास्ञात देखील ते पारंगत होते समाजाचे हित त्यांना चांगलेच ठाऊक होते. समाजावर होणारा अन्याय त्यांना सहन होत नसे यासाठी मराठ्यांचे राज्य असावे असे त्यांना वाटत होते. ते समाजातील लोकांच्या दुःखावर मायेची फुंकर मारत त्यांना आधार देत म्हणून तर समाज त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होता. सर्व समाजातील त्यांचे मित्र होते मलिक अंबर, रणदुल्लाखान सिद्धी सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. रणदुल्लाखान तर त्यांचा मित्रच होता.शहाजीराजे कर्नाटका सारख्या ठिकाणी पंधरा ते वीस हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोराञ लढत होते तेथील प्रजा शहाजीराजांना आधारस्तंभ मानत होती. शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहीम फत्ते करून होदिगिरी गावी मुक्कामाला येत होते. जंगलात अचानक त्यांना एक शिकार दिसली. घोड्यावरुन शिकारीसाठी वेगाने निघाले असता. घोड्याचा पाय रानवेलीत अडकून घोडा व शहाजी राजे दूर फेकल्या गेले व मुर्छित होऊन त्यांचा दिनांक २३-जानेवारी-१६६४रोजी मृत्यू झाला.एक धगधगता सूर्य अस्तास गेला.अशा या महान योध्दास यांच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम करतो.
