
*जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक होते. समवेत पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी शालेय परिसर व गावातील सार्वजनीक ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता अभियान राबवून अहिल्यादेवींना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य पवार म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे संपूर्ण जीवन म्हणजे पराक्रमीची पराकाष्ठा, उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य, राजकीय मुत्सद्देगिरी, आधुनिक विचारांनी केलेल्या नानाविध सुधारणा, असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार लोककल्याणकारी कार्य आदींनी व्याप्त आहे. अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी बालवयातच शिस्तीचा अंगीकार करावा असे आवाहन पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डी. एस. जमधाडे यांनी केले तर आभार प्रा. ए. व्ही. अहिरे यांनी मानलेत.
