
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००४ वा दिवस आपण मनुष्य आहोत. देवाने आपल्याला विचारशक्ती दिली आहे. ती यासाठी की आपण तिचा योग्य प्रकारे वापर करावा, यासाठी नाही की पशूंना कुणीही हाकून घेऊन जावे त्याप्रमाणे आपण देखील कोणीही येऊन काहीही ठासून सांगितले की त्याच्यामागे निमुटपणे चालू लागावे यास्तव मला असे वाटते की आपण आपल्या भूत आणि वर्तमान काळाविषयी सर्व तथ्य सारी माहिती गोळा केली पाहिजे आपला दैदिप्त्यमान इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्यावर नीट विचार केला पाहिजे व त्याच्या आधारे भविष्याची योजना आखली पाहिजे. आपण निव्वळ भावनेच्या आहारी जाऊ नये. *स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर ३० श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण कृष्ण /वद्य १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५ ★ १९३१ संगीततज्ञ, गायक, संगीतप्रसारक, गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा स्मृतिदिन.
★ महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन.
★ १९८१ गांधीवादी नेते, देशभक्त, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा स्मृतिदिन.
