
सिन्नर ( प्रतिनिधी ) सिन्नर ग्राहक पंचायत, महामित्र परिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नर व सर्व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक सिन्नर येथे ग्राहक दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी दत्ता शेळके जिल्हा संघटक तथा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण नाशिक यांनी ग्राहकांचे अधिकार हक्क व संरक्षण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनिसचे अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे वस्तू खरेदी करत असताना ज्या विविध फसवेगिरी चालतात याविषयी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे. कर्ज घेताना त्याचप्रमाणे कोणतीही अग्रीम करत असताना वाचून निर्णय घेतला पाहिजे. याविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात महामित्र दत्ता वायचळे यांनी ग्राहक चळवळीचे स्वरूप व्यापक झाले पाहिजे . अपील करताना त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शामसुंदर झळके यांनी जागो ग्राहक जागो या शासनाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. व आभार मानले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बापू चतुर यांनी केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ तांबे, दत्ता भाऊ शेळके, दत्ता वायचळे, रवींद्र घोगे, श्यामसुंदर झळके, राजेंद्र मिठे,अंबादास भालेराव, सचिन आहेर, भाऊसाहेब शेलावट, बस्तीराम कुंदे,प्रमोद काकडे,प्रकाशमाळी, मनोज माळी,अनिल सोनवणे, वसंत देशमुख मोतीराम हरक आधी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
