
मनमाड ( प्रतिनिधी) शहरातील शनी मंदिराजवळ असलेल्या पेशवेकालीन पुरातन श्री बालाजी विठ्ठल मंदिरात शनिवार दिनांक 15 मार्च ते 22 मार्च दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे 20 मार्च रोजी भव्य नगर प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन सायंकाळी चार ते सहा या वेळेत करण्यात आले आहे सप्ताहातील पहाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत काकडा 8 ते 12 वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक गाथा भजन दुपारी तीन ते पाच भजन साडेपाच ते साडेसहा हरिपाठ संध्याकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत हरी कीर्तन होईल.


