
सिन्नर (प्रतिनिधी)१५ फेब्रुवारी २०२६ भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड सिन्नर यांच्या वतीने भगवान एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
द्रोणाचार्य हे कुरूंच्या राजकुमारांसाठी विद्या शिकवत होते. या राजकुमारापैकी अर्जुनमध्ये सर्वश्रेष्ठ धनूरधर बनण्याचे गुण द्रोणाचार्यांना दिसत होते. त्यांनी अर्जुनकडे जास्त लक्ष दिले होते. अर्जुन हा एकमेव शिष्य द्रोणाचार्यांना सर्वाधिक प्रिय होता. स्वःतहून त्यांनी एक घोषणा केली कि, फक्त अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनूरधर असेल.भगवान एकलव्य यांनी द्रोणाचार्यांना गुरू मानत विद्या शिकत गेले. भगवान एकलव्यचे धनूर कौशल्य बघून द्रोणाचार्यांना धक्का बसला होता. कदाचित आपले कथन असत्य ठरणार कि काय ही भीती द्रोणाचार्यांना वाटत होती. द्रोणाचार्यांनी एकलव्यास अंगठा मागून गुरूदक्षिणा घेतली.

द्रोणाचार्यांना स्वताच्या विद्येवर अहंकार असल्याने आणि अर्जुनला स्वयंघोषीत सर्वश्रेष्ठ धनूरधर असल्याचे मानून एकप्रकारे एकलव्य अन्यायच केलाअन्यायाला हसत हसत सामोरा जाणारा अशा महान धनूरधर भगवान एकलव्य यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन योगेश मोरे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार अरुण मोरे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,योगेश पगार निलेश पगार रमेश कळशे राजाराम मोरे बाजीराव मोरे दगू सुर्यवंशी अरुण पवार
,रोहिदास पवार,लक्ष्मण मोरे,दगडू सूर्यवंशी,आदी उपस्थित होते.
