
नांदगाव,प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या न्याय डोंगरी गावापासून अंदाजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील शनिदेव मंदिरासमोर रेल्वे ट्रॅक वर झोकुन देत प्रेमी युगोलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या करणाऱ्या 16 जणांना विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 11 मार्च 2025 रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान नस्तनपुर शनी मंदिर समोरील असलेल्या रेल्वे ट्रॅक वर येणाऱ्या रेल्वे गाडी समोर रेल्वे खाली झोकुन प्रेमी युगोलांनी आत्महत्या केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी गावातील मयत उज्वला रामकृष्ण खताळ वय वर्ष 40 आणि ज्ञानेश्वर माधव पवार वय वर्ष 42 हे दोघे राहत होते. त्यांच्यात प्रेम संबंध होते. गावकऱ्यांनी या दोघांनाही आत्महत्या करा नाहीतर ठार मारू अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या त्रासाला व धमक्यांना कंटाळून शेवटी दोघांनी आत्महत्याचा निर्णय घेत नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर शनी देव मंदिरा जवळ रेल्वे खाली झोपून देत प्रेमी युगोलांनी आत्महत्या केली याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटने संदर्भात फिर्यादी गोविंद नवनाथ मिटके राहणार भाटगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मयत उज्वला राम कृष्ण कथा वय वर्ष 42 ज्ञानेश्वर माधव पवार वय वर्षे चाळीस दोघे राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक संशयित आरोपी (१)अरुण रामा गायकवाड, (२)संदीप वाल्मीक सावंत, (३)प्रकाश वाल्मीक सावंत, (४)सीसीटीव्ही नवनाथ मारुती जाधव, (५)संतोष माधव जाधव, (६)अनिल राजु दखणे, (७)संजय मारुती सोनवणे, (८)रोहिदास मारुती सोनवणे, (९)सोपान सूर्यभान गुंडगळ, (१०)सुनिता ज्ञानेश्वर पवार, (११)सोनल संतोष पवार, (१२)जनाबाई छबु गुंडगाळ,(१३ संदीप उर्फ बाल्या दत्तू जाधव (१४) बापू सटवा गोसावी (१५) छगन दादा साठे राहणार वंजारवाडी, मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक व नितीन सुभाष घाडगे राहणार मनमाड तालुका नांदेड जिल्हा नाशिक यांनी उज्वला रामकृष्ण खताळ व ज्ञानेश्वर माधव पवार यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे आत्महत्या प्रेम करून वेळ शारीरिक सुखाची मागणी करून तसेच दिलेल्या मानसिक त्रास आला व धमक्यांना घाबरून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले असेल या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 108/2025 बी.एन.एस. कलम 108, 351(2)(3),3(5) गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक संतोष भास्कर, पोलीस हवालदार मोरे हे करीत आहेत.

