
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी):- कर्मवीरांनी लावलेल्या मविप्र शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती झाली आहे .विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या सुख सुविधा देणे गरजेचे आहे .ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या दातृत्वातून डुबेरे येथील जनता विद्यालयाला प्रशस्त असा सांस्कृतिक हॉल मिळणार आहे. शासनाच्या मदतीचा विचार न करता गावकऱ्यांनी एकत्र येऊन समाजाचा व गावाचा विकास करावा असे आव्हान राज्याचे कृषिमंत्री नामदार ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकराव कोकाटे बोलत होते.मंत्री कोकाटे पुढे म्हणाले की आजकाल उत्पन्न वाढत चालले पण दातृत्व कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वाजे कुटुंबाचे सिन्नर तालुक्यातील शैक्षणिक विकासात मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांना किमान कौशल्य विकासाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मविप्र संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय आजोबा बाळाजी गणपत वाजे यांच्या स्मरणार्थ तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या दातृत्वातून विद्यालयाला चार हजार स्क्वेअर फुट सांस्कृतिक हॉल बांधून देण्यात येणार आहे. १२ जानेवारी २०२५ राष्ट्रीय व राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन केल्याबद्दल तसेच विविध राष्ट्रीय उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांना विद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे ,उपसभापती देवराम अण्णा मोगल ,संचालक ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मणराव लांडगे ,कृष्णाजी भगत, माजी संचालक राजेंद्र नवले, हेमंत नाना वाजे ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके ,दिप्तीताई वाजे, संगीता पावसे, सरपंच रामनाथ पावसे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायणशेठ वाजे, व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने,मुख्याध्यापक रंगनाथ उगले, उपमुख्याध्यापक रामदास वाजे आदी मान्यवर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .कृषिमंत्री नामदार माणिकराव कोकाटे, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे ,जेष्ठ सभासद धिंगाण बाबा पावसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले यांनी केले .यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे ,संस्थेचे अध्यक्ष सुनिल ढिकले ,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल आदींनी मनोगत व्यक्त केले. अरुण वारुंगसे व निशाताई वारुंगसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे यांनी विद्यालयास चार नवीन खोल्या बांधून दयाव्या अशी मागणी केली .त्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. गावातील विविध संस्थांच्या वतीने नामदार माणिकराव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शालेय समितीचे सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर करपे यांनी केले तर आभार ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांनी मानले. यावेळी आर्किटेक्चर जितेंद्र जगताप ,कॉन्ट्रॅक्टर हेमंत कांगणे, शालेय समितीचे सदस्य काशिनाथ वाजे ,शरद माळी अशोकराव गवळी, अर्जुन वाजे ,भाऊपाटील वारुंगसे, विजय वाजे ,पांडुरंग वारुंगसे प्रवीण वारुंगसे, दामोदर कुंदे, वसंत जाधव, ज्ञानेश्वर ढोली ,सोमनाथ वारुंगसे आदींसह शालेय समितीचे सदस्य ,संस्थेचे सभासद , विविध संस्थेचे पदाधिकारी ,पालक -शिक्षक व माता/ पालक संघाचे पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

