
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९८ वा दिवस* जगात काय चुकीचे आहे हे दाखवून देऊन आणि त्याचा केवळ निषेध करून नवनिर्मिती होत नसते. देशाचे पुनरुत्थान, पुनर्बांधणी, पुनर्निर्माण करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी केंद्रित आणि संघटीत होऊन आपले बळ एकवटले पाहिजे. मोठ्या गोष्टी या केवळ त्यागानेच होतात. शेवटी देशाच्या उभारणीच्या साऱ्या चर्चा एकाच गोष्टी जवळ येऊन थांबतात. “मी देशास काय देण्यास तयार आहे? मी माझ्या देशासाठी, समाजासाठी किती वेळ, किती पैसा आणि किती शक्ती देऊ शकतो.”
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २४ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण कृष्ण /वद्य ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ ★ श्रीकृष्ण जयंती उपवास
★ फरवरर्दीन पारसी नववर्ष १३९५ प्रारंभ
★ १७६९ असामान्य सेनापती, कुशल प्रशासक, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बानापार्ट यांचा जन्मदिन
.★ १८७२ क्रांतिकारक, महान तत्वज्ञ, योगी अरविंद घोष यांचा जन्मदिन.
★ १९४७ भारत ब्रिटिश राजवटीतून पूर्णपणे स्वातंत्र्य झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पदाची सूत्रे हाती घेतली.*मरुता शाम्पमानं उच्चैर्विराजमानम् ।* *रुचिरं त्रिवर्णकान्तं राष्ट्रध्वजं नमामि ||*तेजस्वी अशा तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या खूप उंचावर वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाला मी वंदन करतो. ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु राहो.
