
नांदगाव ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या पावन भुमीत जन्माला आलेले, वारकरी सांप्रदायचा ज्यांनी पाया रचला असे विश्व भुषण,विश्वरत्न, ज्ञानियांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मास 750 वर्ष पुर्ण होत असल्याने व जागतिक पसायदान दिन प्रित्यर्थ ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनु. प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सरताळे येथे संस्था सरचिटणीस मा. रमेश अप्पासाहेब पगार यांच्या व संस्था कोषाध्यक्षा श्रीमती नम्रता शेवाळे मॅडम व आश्रमशाळा प्राचार्य श्री समाधान चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सामुदायिक पसायदान घेण्यात आले.

सदर प्रसंगी आश्रमशाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी पसायदान म्हणजे काय आणि माऊली ज्ञानदेवांनी ब्रम्हाण्ड नायक,जगदपती,विश्वात्मा कडे विश्वाच्या कल्यानार्थ काय मागणी केली त्या बद्दल सविस्तर माहिती देत सामुदायिक पसायदान घेण्यात आले.
