
मांडवड (प्रतिनिधी) म.वि.प्र. संचलित स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयात “विज्ञान छंद मंडळा”ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत आहेर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव सर व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव विद्यालयाचे प्राध्यापक भागवत एस. एन. हे होते. सर्वप्रथम सरस्वती मातेचे, नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न सी.वी.रमण तसेच भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जी.थेटे यांनी केले.

आपल्या प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावे व समाजातील प्रत्येक गोष्टीकडे डोळस वैज्ञानिक दृष्टीने बघावे असे आव्हान केले. प्राध्यापक भागवत सर यांनी थोर शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांना “फादर ऑफ ग्रीन रेवोल्युशन ऑफ इंडिया” का म्हटले जाते त्यांनी केलेल्या शेती पिकावरील कामावर प्रकाश टाकला. डॉक्टर संजय बच्छाव यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञान हीच सर्व विषयाची जननी आहे आणि आपण आपल्याकडे असलेल्या 35 पदव्या या केवळ विज्ञान शाखेतून शिक्षक घेतल्यामुळे मिळू शकलो असे आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रमाप्रसंगी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विज्ञान छंद मंडळाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता दहावीचे विद्यार्थी सिद्धी थेटे, सचिव म्हणून सुमित इल्ले, सहसचिव तेजस्विनी कदम, खजिनदार उमेश आहेर, प्रसिद्धी अधिकारी कादंबरी थेटे व प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक महाले आर. एस. विज्ञान शिक्षक परदेशी एच.टी. लाठे ए.के., अहिरे एम. के. यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका मविप्र संचालक अमित भाऊ बोरसे (पाटील) यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सिद्धी थेटे व शीतल जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक संदीप आहेर सर यांनी केले.
