
सिन्नर ( प्रतिनिधी ) सिन्नर ग्राहक पंचायत व सिन्नर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तहसील येथे 15 मार्च जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सागर मुदांडा नायब तहसीलदार साहेब हे होते. महामित्र ( सेवानिवृत्त नायब तहसीलदार). दत्ताजी वायचळे यांनी प्रास्ताविकात ग्राहक दिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचे आव्हान यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. दत्ता शेळके जिल्हा संघटक तथा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नाशिक, यांनी या कार्यक्रमास या वर्षी शासना कडून ” सस्टेनेबल जीवन शैलीकडे न्याय संक्रमण “हि थीम देण्यात आली आहे. त्या बाबत उपस्थितांना शाश्वत जीवनशैली या विषयी सविस्तर माहिती दिली.१५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन याच दिवशी का ?साजरा केला जातो याची माहिती व इतिहास उपस्थितांना डॉ. श्यामसुंदर झळके यांनी आपले मनोगतात व्यक्त केले. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, तसेच ग्राहकांनी अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळावा जेणे करून या अनावश्यक वस्तू कालबाह्य झाल्यावर त्याचा उपयोग होत नाही.पैशांचा अपव्यय होतो. शिवाणी बोराडे, ,सदस्य ग्राहक पंचायत सिन्नर.यांनी फसवणूक झालेल्या पीडितांना ग्राहक आयोगा कडून कसा न्याय मिळतो व कार्यप्रणाली याची माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात सागर मुंदडा यांनी ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना घ्यायची काळजी व ग्राहकांचे हक्क व कर्तव या बाबतीत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.सूत्र संचालन विवेक जमदाडे निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग सिन्नर तहसील कार्यालय यांनी केले.कार्यक्रमास संजय धनगर नायब तहसीलदार सिन्नर, विशाल धुमाळ पुरवठा निरीक्षक,दत्ता वायचळे,रवींद्र घोगे ,बापूसाहेब चतुर, शिवाणी बोराडे, श्यामसुंदर झळके, शशिकांत सावंत, बस्तीराम कुंदे, प्रमोद काकडे, प्रभाकर चतुर सर्व ग्राहक पंचायत सदस्य , सिन्नर तहसील कार्यालयीन कर्मचारी, तहसील कामानिमित्त आलेले ग्राहक ग्रामस्थ उपस्थित होते.


