
नांदगाव( प्रतिनिधी)नांदगाव येथील अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक सोनवणे यांचे सामाजिक कार्य हे नुसते होलार समाजाप्रती नसुन बहुजन समाजातील प्रत्येक तळागातील,गोरगरीब, दिव्यांग,हृदपकाळ,निराधार माता बघीनी व बांधवांसाठी प्रामाणिक पणे असल्याने त्यांच्या कामाची पावतीची देखल घेत अखिल भारतीय होलार समाजाचे संघटनेचे प्रमुख जेष्ठ नेते माणिकराव भंडगे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे घोषित होताच फाटाक्यांच्या गजरात शेकडो कार्यकर्तेनीं जोरदार जल्लोष केला होता.

होलार समाज बांधव यांच्यासह त्यांच्यावर विविध पक्षाचे तसेच बहुजन समाजातील प्रत्येक घटकांनी पदाधिकारी,सामाजिक संघटना,माजी नगरध्यक्ष, माजी नगरसेवक,तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता.अधिक माहिती अशी की दि 12/8/2025 रोजी शासकीय विश्राम गृह येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेची बैठक राष्ट्रीय प्रमुखांच्या आदेशानुसार पार पडली होती.यावेळी तालुक्यातील व शहरातील होलार समाजातील शेकडो समाज बांधव यांच्यासह बहुजन समाजातील विविध प्रमुख घटक उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन भीम शक्तीचे मनोज चोपडे यांनी पार पाडले संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंडगे यांच्या आदेशानुसार नवनियुक्त पदी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणुन दीपक सोनवणे,यांची तर जिल्हा अध्यक्ष सागर जाधव,तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक राजेंद्र आविळे,उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस नितीन सोनवणे, शहराध्यक्ष महेश चौघुले यांची निवड झाल्याने या बैठकीत घोषित करण्यात आले. उपस्थितीत मान्यवरांपैकी वाल्मिक जगताप सर,माजी उपनगर अध्यक्ष नितीन जाधव, धनगर समाजाचे राजेंद्र शिंदे, यांनी निवड आणि त्यांच्या कार्या बद्दल सवांद करून शुभेच्छा दिल्या

नांदगाव नगरीचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,माजी उपनगराध्य नितीन जाधव, चेतन पाटील,अरुण साळवे, वाल्मिक जगताप,भाजपचे संजय सानप,रिपाई नेते, देविदास मोरे,भास्कर निकम, महावीर जाधव मनोज चोपडे, धनगर समाजाचे,राजेंद्र शिंदे, माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे,शरद उगले, तारा शर्मा,तसेच एकलव्य संघटनेच्या मान्यवरांनी शाल बुक्के,श्रीफळ देत यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील चाहत्यांनी देखील सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती शहरातील सर्व होलार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रिपाइंचे पदाधिकारी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी,शिवसेना गटाचे पदाधिकारी,एकलव्य संघटनेचे पदाधिकारी आणि बहुजन बांधव,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
