
नांदगाव (प्रतिनिधी )- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव या तीनही संकुलांच्या संयुक्त विद्यमानाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजारोहण व पसायदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश पाटील होते. मंचावर प्राचार्य कैलास जाधव, मुख्याध्यापिका ज्योती काळे, मुख्याध्यापक अविनाश सोळंके, उपप्राचार्य सोमनाथ ठाकरे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे उपस्थित होते. ध्वजाचे ध्वजारोहण, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. पसायदानाचा प्रसंगी सर्वश्रेष्ठ, जगद्गुरु, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचा पूजन मंचावर उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. पसायदानाचे पठण विद्यालयाच्या संगीत शिक्षिका कल्पना अहिरे , शालेय गीतमंच व सर्व विद्यार्थ्यांनी केले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी ‘हर हर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व सांगितले. “आपल्या प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकून आपण आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करत आहोत”, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य कैलास जाधव यांनी विद्यार्थ्यांना देशाप्रती आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये राजेश पाटील यांनी पसायदान ,ज्याला “प्रसादाचे दान” असे म्हणतात. ज्ञानेश्वरी लिहिण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणाकरिता, परमेश्वराकडे जे मागणे मागितले, ते म्हणजे पसायदान. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रांगणातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
