
ओझर 🙁 प्रतिनिधी )दि.१४ वार्ताहर हिंगोली येथे आयोजित केलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सबज्युनियर फेंसिंग स्पर्धेत मराठा हायस्कुलचा विद्यार्थी प्रणव नरेंद्र डेर्ले, शौर्य यादव, विराज केंद्रे यांनी फॉईल सांघिक प्रकारात सुवर्ण कामगिरी नोंदवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या १२ वर्षांखालील राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेत या तीनही खेळाडूंनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकावल्यानंतर लगेचच हिंगोली येथे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत सरस कामगिरी केली. सोलापूर,जालना,छत्रपती संभाजीनगर, धुळे, पुणे, अकोला, जळगाव, धाराशिव यांच्या विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात साजेसा खेळ करत सांघिक फॉईल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. त्याच्या या यशात त्यांचे मुख्य प्रशिक्षक प्रसाद परदेशी, अशोक दुधारे, राजू शिंदे, जय शर्मा, आनंद चकोर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. म.वि.प्र. चे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, डॉ.सयाजीराव गायकवाड, शिवा पाटील गडाख, मराठा हायस्कुलचे मुख्याध्यापक थोरात सर, उपमुख्याध्यापक श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री.भारतीसर , श्री.काळे सर, श्री.पवार सर , विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.डेर्ले सर, श्री.पोटे सर, श्रीम.शिंदे मॅडम, श्री.उगले सर, श्री.कुंभार्डे सर या सर्वांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.
