
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९७ वा दिवस
वाढदिवस शुभेच्छा

आगामी पन्नास वर्ष आपली भारत माता हेच आपले एकमेव श्रद्धास्थान असले पाहिजे, आपल्या देशाच्या सर्व भावी आशा आकांक्षा तुमच्यावरच अवलंबून आहेत. उठा लांबच लांब रात्र संपून नवभारताच्या अरुणोदयाचा समय समिप आला आहे. आता प्रगतीची एक विशाल लाट उठली आहे तिचा वेग कोणीही रोधू शकत नाही. बंधूंनो! आता आपल्या सगळ्यांनाच खूप कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावे लागेल. आता झोपायला वेळ नाही. आत्मविश्वासाने कार्यास सिध्द व्हा.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५
★ १९०८ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य करणाऱ्या गोदावरी शामराव परुळेकर यांचा जन्मदिन.
★ २०१२ केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
