
नांदगाव – (प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या नांदगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड निश्चित झाली आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी मनमाड येथे सेंट झेवियर्स विद्यालयात झालेल्या विज्ञान मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूलचा कुमारी वेदिका संजय जाधव या विद्यार्थिनीने *क्वांटम (Quantum) युगाची सुरुवात- संभाव्यता व आव्हाने* या विषयावर व्याख्यान सादर केले. या व्याख्यानातून तिने आपले कौशल्य दाखवून आपली जिल्हास्तरीय निवड निश्चित केली. तिच्या यशाबद्दल तालुका संचालक आदरणीय अमित भाऊ बोरसे पाटील, शालेय समिती अध्यक्ष श्री विजय काकळीज यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचं व तिला मार्गदर्शन करणारे श्री गजेंद्र माताडे व सर्व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या .
