
पेठ..(प्रतिनिधी )मविप्र आश्रम शाळेत इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री सुभाष दळवी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजल भरसट आणि अंकिता यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. यशस्तवन आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. इयत्ता अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री कोटमें श्री पवार श्री राजेंद्र चव्हाण श्री दाते श्री भूरभूडे श्री बच्छाव श्री हिरामण भोये श्रीमती गिते मॅडम आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षक श्री कवर सर उपस्थित होते. शेवटी आभार कु. रेखाने मानले.

