
.उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )नवतरुण मित्र मंडळातर्फे उरण तालुक्यातील श्री अक्कादेवी मंदिर पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन विभाग उरण रायगड यांचे तर्फे एम. के. म्हात्रे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून पाण्यात बुडलेले व्यक्ती, अपघात ग्रस्त व्यक्ती, भाजलेले व्यक्ती, हार्ट अटॅक आलेल्या व्यक्ती, विजेचा धक्का लागलेल्या व्यक्ती तसेच सर्पदंश झालेले व्यक्ती यांच्यावर डॉक्टरी इलाज होईपर्यंत आपण प्रथमोपचार कशा पद्धतीने करू शकतो याचे खूप मोलाचे मार्गदर्शन केले.काही प्रात्यक्षिक देखील सादर केले .

प्रमुख उपस्थिती असलेले पाणजे ग्रामपंचायतचे सरपंच लखपती पाटील यांनी मंडळाच्या ४१ वर्ष अविरत कार्यरत असलेल्या मंडळाबद्दल मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर नमित पाटील ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष तसेच हितेश भोईर उपसरपंच यांनी देखील उपस्थित राहून सहकार्य केले.आणि त्यामध्ये पाणजे गावातील युवकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.सदर शिबिर संपन्न होण्यासाठी नवतरुण मित्र मंडळातील सर्व सभासदांनी चांगले सहकार्य केले. विश्वनाथ पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच हेमंत पाटील यांनी मंडळाचे प्रास्ताविक सादर केले. मंडळाचे अध्यक्ष दर्शन पाटील, मंजीत पाटील , सुनील पाटील, विक्रम पाटील, कैलास पाटील,पाटील दीपेश पाटील, मिलिंद पाटील, सुशांत पाटील नंदलाल पाटील महेंद्र पाटील, कुणाल पाटील, चंद्रकांत पाटील, जुगल पाटील, व मंडळाचे सर्व सदस्य आणि हितचिंतक यांनी उपस्थित मान्यवर व सर्व युवकांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.तसेच ग्रामपंचायत पाणजे व ग्राम सुधारणा मंडळ पाणजे यांचे देखील आभार मानण्यात आले.मार्गदर्शक एम के म्हात्रे यांनी अशा चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
