
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४५ वा दिवस
सारी परिस्थिती अनुकूल असतांना मोठे पद मिळाल्यावर तर कोणीही मोठा होऊ शकतो! एखादा भित्रा मनुष्य देखील रंगमंचाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशात वीर बनतो. जग सारखे बघत आहे मग कुणाचे हृदय स्पंदित होणार नाही? आपले कार्य शक्य तितक्या चांगल्या रीतीने करेपर्यंत कुणाची नाडी जोराने चालणार नाही? पण मला खरा थोरपणा तर त्या किड्यातच दिसत आहे की जो आपले कर्तव्य प्रतिक्षणी शांतपणे, निश्चयपूर्वक पार पाडीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जो संयमाने, निष्ठेने, नियमितपणे, सातत्यपूर्णपणे कार्य करतो व स्वतःचे नेतृत्व सिध्द करतो. तोच खरा नायक ठरतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ फाल्गुन शके १९४६
★ फाल्गुन पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. १४ मार्च २०२५
★ धुळवड, धुलिवंदन
★१८७९ जर्मन भौतिक शास्त्रज्ञ, नोबल पारितोषिक विजेते अॅल्बर्ट आइनस्टाइनचा जन्मदिन
★ १८८३ समाजवादी विचारवंत, लेखक कार्ल मार्क्स यांचा स्मृतिदिन
★ २००३ कविवर्य सुरेश भट यांचा स्मृतीदिन.
★ २०१८ पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिध्दांत मांडणारे फिजिसिस्ट प्राध्यापक स्टीफन हाॅकिंग यांचा स्मृतिदिन
★ राष्ट्रकुल दिन.
★ धुळवडच्या हार्दिक शुभेच्छा🔴🟠🟢🟣


