
वडांगळी(प्रतिनिधी). मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात मविप्र समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे होते.यावेळी व्यासपीठावर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख विलासराव तांबे, विजय कोकाटे, रवींद्र हांडगे, काकासाहेब तांबे, दत्तात्रय पाचोरे, प्रशांत पाटील, राजेंद्र गीते,सुभाषराव ठोक, मोहिनी क्षीरसागर,विलास गोसावी निशा राजेभोसले, अशालाता पाटील, स्मिता वाघ, सीमा भामरे, राजाराम खेताडे, उज्वला गांगुर्डे,मनीषा आगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी रहेनुमा शेख व अनुष्का सानप या विद्यार्थिनींनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याची ओळख करून दिली. शिक्षक मनोगतात बाळासाहेब सांगळे व प्रा.देविदास खालकर यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी मविप्र संस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की कर्मवीर रावसाहेब थोरात हे संस्थेचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकाभिमुख अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. त्यांनी त्या काळात अनेक शाळा सुरू केल्या. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा शिक्षणविषयीचा दृष्टिकोन आधुनिक व उदारमतवादी होता.समाजसेवा हाच त्यांचा प्राण होता. समाजातील रूढी अज्ञान व अंधश्रद्धा तसेच परंपरा या शिक्षणामुळे दूर करता येतील. अशी त्यांची दूरदृष्टी होती. बहुजन समाजासाठी शिक्षण मिळाले पाहिजे व शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांनीच मविप्र संस्था नावारुपाला आणली. असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपराव म्हस्के यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन देविदास खालकर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
