
मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.प्राचार्य संजय डेर्ले, उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.प्रज्ञा चांगले इ.६वी ई हिने कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जिवनपट मांडला.जुलै १९१४ मध्ये बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी राजर्षी शाहूमहाराज,गणपतदादा मोरे,कॅप्टन डी.आर.भोसले आणि कीर्तीवानराव निंबाळकर यांच्या मदतीने नाशिक येथे संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.ते बहुजन समाजाचे दीपस्तंभ होते अशा शब्दात स्तुती सुमनांजली वाहीली. आभार प्रदर्शन कु.आदित्य झिरवाळ इ.६वी ई याने केले.सविता आहेर यांनी होळी या सणाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी व निसर्गसंवर्धन करावे असे आव्हान केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका मोहिनी खैरनार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
