
सायखेडा (प्रतिनिधी ) मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर ,कॉलेज सायखेडा येथील संचिता संपत कांडेकर या विद्यार्थिनींनी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन नाशिक विभाग आयोजित ईट राईट मेळा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. ‘निरोगी आयुष्य माझी भूमिका, या विषयावर सदर निबंध लिहिण्यात आला, या यशाबद्दल तिचे मा. ना. नरहरी झिरवळ साहेब मा. जलजी शर्मा जिल्हाधिकारी नाशिक मा.राजेश नार्वेकर आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई, यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम 3000 ₹ रुपये देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ्ॅड नितीन ठाकरे ,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले ,सभापती मा. बाळासाहेब शिरसागर ,उपाध्यक्ष श्री .विश्वासराव मोरे, उपसभापती मा. डी.बी. अण्णा मोगल ,संचालक माननीय शिवाजी आप्पा गडाख ,मा. कमलाकांतचार्य महाराज. मा.विजय कारे, नितीन गावले ,अश्फाक शेख मुख्याध्यापक नवनाथ निकम उप मुख्याध्यापक दाते आर. पी. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पालक बंधू आणि भगिनी या सर्वांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
